जळगाव : प्रतिनिधी
दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना पोलिसांनी रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुलासह चार जिवंत काडतूसे, चॉपर, चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील काही संशयित हे हिस्ट्रीशिटर आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
इम्रान शेख उर्फ मॉडेल रसूल शेख (रा. भारत नगर, भुसावळ), अरबाज शेख शबीर (रा. तेली गल्ली, भुसावळ), मुजम्मिल शेख मुज्जू शेख हकाम, शोएब इकबाल खाटीक (दोन्ही रा. फैजपूर), आदित्य सिंग उर्फ विक्की अजय ठाकूर, राहूल उर्फ चिकू राम डेंडवाल आणि मोहित जितेंद्र मेलावंस (तिघे रा. खंडवा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायवेलगत वॉटर पार्कच्या मागील मोकळ्या जागेत बंदूक आणि घातक हत्यारांसह काहीजण आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.