Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : मुंबईत बेस्टने चिरडल्याने पाच जणांचा मृत्यू
    क्राईम

    खळबळजनक : मुंबईत बेस्टने चिरडल्याने पाच जणांचा मृत्यू

    editor deskBy editor deskDecember 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मुंबईतील कुर्ला उपनगरात बेस्टची इलेक्ट्रिक बस भरधाव वेगात गर्दीत घुसली आणि रिक्षासह, खासगी वाहने आणि प्रवाशांनाही धडक दिली. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

    आफरिन रसूल शाह (१९), आझम शेख (२०), कनिस फातिमा कादरी (५५) आणि शिवम कश्यप अशी मृतांची नावे आहेत. आरोपी बसचालक संजय मोरे (५०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ब्रेक फेल झाल्याचे चालकाचे म्हणणे आहे. याबाबत आरटीओचे पथक अधिक तपासणी करत आहे. कुर्ला पश्चिमेकडील महापालिकेच्या एल वॉर्ड कार्यालय परिसरात सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दोन जणांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोहीनूर रुग्णालयात आणखी एकाचा मृत्यू झाला तर दोन जण अत्यवस्थ आहेत.

    स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिमेकडील बेस्ट बसस्थानकाहून ३३२ क्रमांकाची बस (एम.एच.०१, इ.एम.८२२८) अंधेरी स्थानकाकडे निघाली होती. या बसने रस्त्यावरील रिक्षासह खासगी वाहने आणि प्रवाशांनाही धडक दिली. जखमींना तात्काळ भाभा रुग्णालयात हलविण्यात येत असतानाच येथे स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘खरात सरकारचाच माणूस’ : नाना पटोले यांचा गंभीर आरोप !

    April 12, 2026

    ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन !

    April 12, 2026

    आयटी क्षेत्रातील तरुणीचा गंभीर आरोप; फसवणूक, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरणी तपासाची मागणी !

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.