जळगाव : प्रतिनिधी
दारूच्या नशेत वेडीवाकडी दुचाकी चालविणारे दुचाकीस्वार समोरुन येणाऱ्या आयशरवर धडकले. या अपघातात ईश्वरसिंग मेहेरसिंग टाक व नेपालसिंग नेहेरसिंग टाक (दोच रा. तांबापुरा) हे गंभीर जखमी झाले. ही घटना ६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सिंधीकॉलनी रोडवरील कलाभवसमोर घडली. याप्रकरणी दुचाकीस्वारांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील देवगाव येथील नरेंद्र युवराज सोनवणे हे पोलीस दलातील (एमएच १९, एम ९२१४) क्रमांकाचे आयशर वाहन सिंधी कॉलनीकडून पांडे डेअरी चौकाकडे जात होते. यावेळी ईश्वरसिंग टाक व नेपालसिंग टाक हे दोघे (एमएच १९, टी ६८१८) क्रमांकाच्या दुचाकीवरुन दारुच्या नशेत बेडीवाकडी चालवून सिंधी कॉलनीकडे जात होते. यावेळी समोरुन येणाऱ्या आयशरवर दुचाकी धडकून अपघात झाला, यामध्ये नेपालसिंग टाक हे गंभीर जखमी झाले असून ईश्वरसिंग टाक हे देखील जखमी झाले आहे, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी आयशर चालक नरेंद्र सोनवणे गांनी दिलेल्या तक्रारीवरुन दोष दुचाकीस्वारांविरुद्ध जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.