जळगाव : प्रतिनिधी
सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करुन हात्तात चॉपर घेवून दहशत माजविणारा चिकी उर्फ माया गणेश शिंदे (वय २०) याच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या, त्याच्याकडून धारदार चॉपर जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चौघुले प्लॉट परिसरात विक्की उर्फ माया गणेश शिंदे हा दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हातात चॉपर देवून परिसरात शिवीगाळ करीत सार्वजनिक शतितेचा भंग करुन दहशत माजवित होता, याबाबतची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या, त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध आनंॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकी विजय खैरे हे करीत आहे