जळगाव : प्रतिनिधी
भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने कारचे नुकसान झाल्याची घटना दि. २९ नोव्हेंबर रोजी आदित्व लॉनजवळ पडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रभात कॉलनीत अभिषेक अविनाश लाठी हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २१ रोजी ते रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आदित्य लॉन परिसरात (एमएच १९, ईएल ४४९४) क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे नुकसान झाले. लाठी यांनी दि. ७ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार दुचाकीस्वार जयदीप राठोड रा. मन्यारखेडा ता. जळगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों रामदास कुंभार हे करीत आहे