Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव शहरातून मोटारसायकीलींची चोरी करणारा गुन्हेगार अटकेत
    क्राईम

    जळगाव शहरातून मोटारसायकीलींची चोरी करणारा गुन्हेगार अटकेत

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहे. संशयित आरोपी रूपेश संजय पाटील रा. साखरे ता. धरणगाव हा त्याच्या साथीदारासह जळगाव शहरात दुचाकींची चोरी करत असल्याचे गोचोरी करत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, युनुस शेख, रमेश जाधव, पोलीस हवलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, संदीप साबळे, पोना राहुल पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, ईश्वर पाटील, प्रविण मांडोळे, उमेश गोसावी, हेमंत पाटील, दिपक शिंदे, मुबारक देशमुख यांनी सापळा रचुन संशयित आरोपी रूपेश पाटील याला अटक केली. त्याच्या कडून चोरीच्या एकुण पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

    त्याने दिलेल्या कबुलीतून व हस्तगत करण्यात आलेल्या चोरीच्या दुचाकीच्या माध्यमातून जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनमधील २, जळगाव शहर पोलिस स्टेशनमधील २ व पंचवटी पोलिस स्टेशन नाशिक येथील एक असे एकुण ५ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासकामी त्याला जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.