जळगाव : प्रतिनिधी
साहित्य बाजूला करण्यास सांगितल्याचा राग आल्याने कुंदन अरुण राणे (वय ३६, रा. कानळदा, ता. जळगाव) याला रविंद्र सुरेश शिंदे व राहुल सुरेश शिंदे (दोघ रा. कानळदा) यांनी शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना दि. ६ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कानळदा गावात कुंदन राणे हे वास्तव्यास असून दि. ६ रोजी त्यांच्या घरासमोर त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी बांधकामासाठी लागणारे साहित्य ठेवलेले होते. राणे यांना रस्त्यावरुन येण्या जाण्यासाठी रस्त्यात पडलेले साहित्य बाजूला करण्यासाठी रविंद्र शिंदे व राहुल शिंदे यांना सागितले. त्याचा राग आल्याने दोघ भावांनी कुंदन राणे यांना मारहाण केली. तसेच त्याठिकाणी पडलेल्या लाकडी दांडक्याने सुरेश शिंदे याने राणे यांच्या पायावर आणि पाठीवर मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी कुंदन राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दोघ भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ धनराज पाटील हे करीत आहे.