जळगाव : प्रतिनिधी
पोलिसांचे बॅरिकेड्स घेऊन जाणाऱ्या वाहनावर दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील दोघे भाऊ जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी कलाभवनजवळ झाला. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली नाक्यावरील सद्गुरू नगरातील ईश्वरसिंग मिहेरसिंग टाक (३५) व त्यांचा भाऊ नेपालसिंद मिहेरसिंग टाक (३६) हे दोघे भाऊ दुचाकीने जात होते. त्या वेळी ते पोलिसांच्या वाहनावर धडकले. यात दोघांनाही मार लागल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. यातील ईश्वरसिंग यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.