जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय समाज पक्षाकडून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी सर्व निवडणुका कोणत्याही मदतीशिवाय लढविणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी आज पत्रकार परिषदेत घोषित केले आहे. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या जाहीर करण्यात आले.
जळगाव जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे नियुक्त प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते आणि राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांचा सत्कार समारंभ बळीराम पेठेतील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा शेवते यांनी केले. याप्रसंगी राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, अजित पाटील, राजेंद्र पोथाडे, डॉ. प्रेमराज पळशीकर, जिल्हा प्रभारी प्रा. विठ्ठलराव शिंगाडे, समाधान पाटील, संतोष बंजारी, शुभांगी विसावे, गणेश चितळे, राजेंद्र चौधरी, प्रकाश पाटील, प्रवीण सावळे आदी प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केले आहे. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महानगर प्रमुख गणेश चितळे, महिला आघाडी प्रमुख शुभांगी विसावे, ओबीसी आघाडी प्रमुख सचिन भोसले, युवक आघाडी प्रमुख पवन सोनवणे, लोकसभा संघटन मंत्री संतोष वंजारी आणि जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण सावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.