मुंबई : वृत्तसंस्था
अखेर राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून उद्या ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची शपथविधी पार पडणार आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आता 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील.
राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची शपथविधी पार पडणार आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आता 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील.
आपण एकमताने गटनेता म्हणून माझी निवड केली. त्याबद्दल आभार. या निवड प्रक्रियेसाठी आलेले रुपानी आणि सीतारामण यांचं मनापासून आभार मानतो. यावेळची निवडणूक ही अतिशय ऐतिहासिक होती. या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी म्हणेल या निवडणुकीने एक गोष्ट ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है. मोदींच्या नेतृत्वात देशात विजयाची मालिका लोकसभेनंतर हरियाणापासून सुरू झाली. महाराष्ट्राने जो कौल दिला आहे. खरं म्हणजे राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो,. असा कौल दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.