यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील एक विवाहिता घरात असताना एका तरुणाने घरात घुसून तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी रात्री घडली होती. याप्रकरणी मंगळवारी यावल पोलिस ठाण्यात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या फिर्यादीवरून रवींद्र कोळी याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.