मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यासह जालन्याच्या वातावरणात दोन दिवसांपासूनकमालीचा बदल झाला असून या आठवड्यात ३, ४ आणि ७ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे. हा पाऊस रब्बीच्या पिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो, तर द्राक्षबागांसाठी मात्र नुकसानकारक ठरणार आहे.
या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हिवाळ्यातील थंडीला सुरुवातझाली. सुरुवातीपासूनच हवेतीलगारवा वाढत किमान तापमानातहळूहळू घट झाली. नोव्हेंबरमहिन्याच्या तुलनेत तापमानाचा पारापाच ते सात अंशाने घसरला.नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तापमान कमालीचे घटल्याचेपाहायला मिळाले. शिवाय माेठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाल्याने त्याचाही परिणाम दिसून आला.यामुळे जिल्ह्यातील जमिनीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली. परतीच्या पावसाने मागीलआठवड्यात ब्रेक लावल्यानंतरथंडीला सुरुवात झाली. नोव्हेंबरमहिन्यात थंडी कमालीची वाढली.पुढील कालावधीत कमालीचा चढउतार नोव्हेंबर महिन्यात पाहायला मिळाला, तर कमाल तापमान १२अंशांवर घटल्याने महिन्यातील सर्वातजास्त थंडीची नोंदही याच महिन्यात झाली. दरम्यान, डिसेंबर महिन्यात मात्र पहिल्या दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल दिसून आला आहे. सकाळ पासून ढगाळ वातावरण आणि दिवसभर हवेत गारवा पाहायला मिळाला. मात्र, थंडीकमी होऊन किमान तापमानाचा पारा एका दिवसात पाच अंशाने वाढला.
डिसेंबर महिन्यात तापमानातकमालीचा चढउतार पाहायलामिळणार असून १ ते ९डिसेंबरदरम्यान कमाल तसेचकिमान तापमान कमी-जास्त होणारआहे. मात्र, त्यानंतर येणाऱ्याआठवड्यात म्हणजेच १० डिसेंबररोजीपासून किमान तापमान ९अंशावर खाली उतरणार आहे. हाबाज तीन दिवस म्हणजेच १२डिसेंबर रोजीपर्यंत कायम राहिल.