Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकी अडवून लूट करणारे दोघे अटकेत
    क्राईम

    दुचाकी अडवून लूट करणारे दोघे अटकेत

    editor deskBy editor deskDecember 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    किनगाव-यावल रस्त्यावर दुचाकी चालकास अडवून दहा हजारांची रोकड व मोबाइल दोन अज्ञात चोरट्यांनी लांबविले होते. ही घटना १६ रोजी घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी दोघांना यावल न्यायालयात हजर केले असता २ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भालशिव-पिंप्री ता. यावल येथील सरपंच मोहन एकनाथ सपकाळे व शिवलाल भगवान सपकाळे हे चोपडा येथून १६ नोंव्हेंबर रोजी रात्री यावलकडे येत होते. दरम्यान किनगावजवळ त्यांची दुचाकी अडवून हत्याराचा धाक दाखवून धमकी देत मोबाइल व १० हजारांची रोकड लांबवली होती.

    पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे परमेश्वर जाधव यांनी तपास चक्रे फिरवित संशयित फरहान शेख फारूख अहेमद (२४) रा. मिर्झानगर इकबाल चौक बुलढाणा, शेख राजिक शेख इसरार (२२) रा. डांगपुरा, यावल या दोघांना अटक केली आहे. शनिवारी यावल न्यायालयात न्या. आर. एस. जगताप यांच्या समोर हजर केले असता दोघांना २ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.