जळगाव : प्रतिनिधी
बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत आज जळगाव जिल्ह्यात सर्वत्र बालविवाह निर्मूलन शपथ घेण्यात आली तसेच जिल्हा महिला बालविकास विभाग युनिसेफ एस.बी.सी. – 3 व आधार फाउंडेशन ,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुक्यात दादासाहेब आर.जी.झांबरे या विद्यालयात विद्यार्थ्यांसोबत बालविवाह मुक्त भारत अभियानाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री. तुषार प्रधान सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच सोबतच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पवन पाटील सर यांनी चाईल्ड लाईन 1098 या नंबर बाबत जनजागृती केली पर्यवेक्षिका अधिकारी मीनाक्षी कोळी मॅडम यांनी बालविवाह निर्मूलन शपथ घेतली व युनिसेफ एस.बी.सी. – 3 जिल्हा प्रकल्प समन्वयक रुचिका इंगळे यांनी बालविवाह निर्मूलन याबाबत शॉर्ट फिल्म दाखवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली संपूर्ण शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्या समवेत जनजागृती रॅली काढण्यात आली सदर कार्यक्रमास शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री एस डी बावस्कर ,सर व्ही. पी. शेजवळ सर, गायकवाड सर , यांचे अनमोल सहकार्य लाभले.कविता पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, गायत्री सरोदे मॅडम त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले, कार्यक्रमास सहकार्य लाभले.