रावेर : प्रतिनिधी
गावातील विजेच्या खांबावरील सर्व्हिस बॉक्सला अचानक आग लागल्याची घटना २६ रोजी घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील बहुतेक गावांत वीजचोरीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणकडून कोटिंग केलेली केबल टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या भागात वीज चोरीसाठी आकडे टाकले आहेत, अशा भागातही केबल टाकण्याचे काम सुरू आहे. विवरे बुद्रुक येथे महिनाभरापासून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. २६ रोजी आझाद नगर भागात केबल टाकण्यात आली. त्यातच केबल टाकल्यावर २४ तासांच्या आतच पोलवरून लावलेल्या सर्व्हिस बॉक्समधील वायर जळाल्याने धूर निघू लागला. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे या भागात एकच खळबळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नुकतेच काम झाले असताना ही घटना घडल्याने वापरलेल्या साहित्याच्या दर्जाबाबत शंका व्यक्त होत आहे