मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुककीचा निकाल जाहीर झाला असून यात महायुतीला 230 जागांवर यश मिळवता आलं आहे. तर महाविकास आघाडीला मात्र 49 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इतक्या जास्त जागा येण्याचा ना भाजपला अंदाज होता, ना एवढा दारूण पराभव होईल या महाविकास अंदाज होता. अनेक एजन्सीने केलेल्या सर्व्हेंमध्ये देखील अटीतटीची लढत असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते. त्यामुळे यंदाचा विधानसभेचा निकाल हा सर्वांसाठीच धक्कादायक आहे. महाविकास आघाडीने या निकालावर आक्षेप घेतला आहे.
राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ काढली होती. आता ‘ईव्हीएम छोडो’ यात्रा काँग्रेसकडून काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाची बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएमवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर भूमिका घेणार आहेत.