Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सिमेंटच्या टँकरचा भीषण अपघात : चालकासह पादचारी ठार
    एरंडोल

    सिमेंटच्या टँकरचा भीषण अपघात : चालकासह पादचारी ठार

    editor deskBy editor deskNovember 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी

    जळगावकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंटच्या टँकरने महामार्गालगतच्या दुकानास जबर धडक दिली. या दुर्घटनेत टँकरचालक फुलचंद (२६, चिलुला, जि. बाराबंकी) हा जागीच ठार झाला, तर पादचारी शकील नबी बागवान (३४, एरंडोल) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    अमळनेर नाक्यानजीक असलेल्या गतिरोधकाजवळ चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. यादरम्यान, अमळनेर नाका परिसरात महामार्गावरील पथदीप बंद असल्याने याठिकाणी याआधीही अनेक अपघात झाले आहेत. सिमेंट घेऊन जाणाऱ्या टँकरवरील चालकाचा (एमएच १५ जेसी १९९५) गतिरोधकावर ताबा सुटल्याने तो आसारीच्या दुकानात घुसला. त्यात चालक हा जागीच ठार झाला. शकील व आई दोघे रात्री परगावावरून आल्यावर रस्त्याने चालत असताना अपघात झाला. शकील हा मागील चाकाखाली आल्याने दोन्ही पाय निकामी झाले. जळगाव येथे खासगी दवाखान्यात उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.