ठाणे वृत्तसंस्था । ओबीसींच्या जनगणनेच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या देशात कुत्र्या, मांजराची गणना होते. मग ओबीसींची जनगणना का होत नाही? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचो ओबीसी मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आव्हाड म्हणाले, तुम्हाला चूप बसून आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी जोरात ओरडा. आपल्यालाही ही लढाई निकराने लढावी लागेल. त्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडावे लागेल, असं सांगतानाच आरक्षण हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. कुत्र्यांची गणना होते. मात्र, ओबीसींची जनगणना का होत नाही? असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्रात डोक्यावर छप्पर नाही असा सर्वाधिक समाज हा आदिवासी आणि भटका आहे. पण आपण मागासवर्गीय आहे, हे सांगायची लाज वाटते काहींना, असं सांगतानाच मोदींना कुणी काय दिले ? यावर मी बोलणार नाही. पण मंडल आयोगामुळे तुमच्यातील महापौर निर्माण झाला.
सोलापुरात कलाल समाजाची पहिली महापौर झाली ते मंडल आयोगामुळेच. हा दारु विकणारा समाज आहे. पूर्वी शिंप्याचं काम करायचा. बिहारमध्ये पिछडा वर्ग आहे. त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव आहे. मात्र, महाराष्ट्रात जातीबाबत ओळख नाही. हे दुर्देव आहे, असं ते म्हणाले.