Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » परिवार बाहेरगावी चोरट्यांनी केले घरसाफ !
    क्राईम

    परिवार बाहेरगावी चोरट्यांनी केले घरसाफ !

    editor deskBy editor deskNovember 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या आयेशा नगरात घरफोडीची घटना घडली. घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करीत कपाटातील सोने व चांदीचे दागिने, रोख रक्कम असा १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार गुरुवारी रात्री निर्दशनास आला. याप्रकरणी शुक्रवारी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आयेशा नगरात सैय्यद साबीर सैय्यद मरू हे केळी व्यापारी राहतात. ते सहकुटुंब गुजरात राज्यातील सुरत येथे लग्न समारंभास गेले होते. दरम्यान, गुरुवारी रात्री त्यांच्या शेजाऱ्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील कपाट फोडलेले दिसले. तेव्हा तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी हवालदार सांगळे, मोहन तायडे दाखल झाले. याबाबत सैय्यद साबीर यांना माहिती देण्यात आली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील कपाटातून १ लाख २ हजारांची रोकड, ५ हजार रुपये किमतीची चांदीची पट्टी व २ हजार रुपये किमतीची सोन्याची फुली असा एकूण १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला. याप्रकरणी यावल पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहेत.

    दरम्यान, शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासन चोरीच्या घटना बाढतच आहेत, यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. बंदोबस्ताची मागणी होत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.