Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महाविकास आघाडीचे दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारले !
    राजकारण

    महाविकास आघाडीचे दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारले !

    editor deskBy editor deskNovember 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होवू लागला आहे. महायुतीला राज्यात चांगले यश मिळाले आहे. तर महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचा यंदा मात्र पराभूत झाले आहे. यात बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे अशा काँग्रेसच्या दिग्गजांना मतदारांनी धक्का दिला आहे. राज्यात आमचीच सत्ता येईल, तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वत:चाच मतदार संघ वाचवू शकले नाहीत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचा हा मोठा पराभव मानला जात आहे.

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. सत्ता स्थापनेचा दावा करणारे काँग्रेसवर आता अनेक मतदारसंघातील महत्त्वाचे नेते गमावण्याची नामुष्की ओढावली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस मधून मुख्यमंत्री पदाचा दावा ठोकणाऱ्या प्रमुख नेत्यांचा देखील पराभव झाला आहे. त्यातही ज्या नेत्यांचा विजय झाला, तो देखील अवघ्या काही मतांनी निसटचा विजय मिळाला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काँग्रेसचा राज्यात सुपडा साफ झाला असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

    अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे पराभूत झाले आहेत. थोरात हे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदान मानले जात होते. तसेच सध्या राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, स्वत:चा मतदार संघ राखण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.