नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात मतदानावेळी राडा झाल्याच्या घटनाने दिवसभर वातावरण तापलेले होतेच. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरही वातावरण निवळलेलं नाही. नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावरच हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, ईव्हीएम घेऊन जाणारी कारवर हल्ला करत तोडफोड केली आह. नागपूर मध्य मतदारसंघातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 मधून संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. दरम्यान, दुपारी बीडमध्ये ईव्हीएम फोडल्याची धक्कादायक घटनाही घडली होती.
नागपुरात अत्यंत गंभीर घटनेत ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनावर हल्ला करून त्या वाहनाची मोडतोड करण्यात आली आहे. नागपूर मध्य विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 मधून संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 वरून जेव्हा ईव्हीएम घेऊन जाणारी तवेरा गाडी मतदान केंद्रातून बाहेर निघाली, तेव्हा त्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचं समजतेय.
ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या कारवर हल्ला झाला त्यावेळेस परिसरातील दक्ष नागरिक आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत पोलिसांना बोलावले. मात्र तोवर दगड आणि लोखंडी रॉड्सने हल्ला करत ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या तवेरा गाडीची जबर तोडफोड करण्यात आली होती.