• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला

editor desk by editor desk
November 19, 2024
in क्राईम, राज्य
0
मध्यरात्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला

नागपूर : वृत्तसंस्था

राज्याचे माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्या गाडीवर चार अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात देशमुख यांच्या कपाळाला गंभीर इजा झाल्याची माहिती आहे.

नरखेड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचाराची सांगता सभा आटोपून देशमुख हे परत येत असताना चार युवक अचानक गाडीसमोर आले एकाने गाडीच्या काचेवर दगडफेक केली. एक मोठा दगड देशमुख यांच्या कपाळाला लागला. रक्तस्राव झाल्याने त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. जखमेच्या जागेवर सूज आल्याने डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. देशमुख यांचा रक्तदाबही वाढला होता. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूरच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

काटोल ग्रामीण रुग्णालयाबाहेर शरद पवार गट आणि महाविकास आघाडीचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काटोल पोलिसांचा ताफाही ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला.

Previous Post

कुटुंबात शुभ आणि धार्मिक कार्य घडण्याची शक्यता !

Next Post

बहिणीच्या विवाहाच्या दिवशी भावाचा दुर्देवी मृत्यू

Next Post
बहिणीच्या विवाहाच्या दिवशी भावाचा दुर्देवी मृत्यू

बहिणीच्या विवाहाच्या दिवशी भावाचा दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group