Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मशालच्या गाडीतून डमी अपक्ष उमेदवार मंगेश कैलास चव्हाण यांचा प्रचार सुरू
    राज्य

    मशालच्या गाडीतून डमी अपक्ष उमेदवार मंगेश कैलास चव्हाण यांचा प्रचार सुरू

    editor deskBy editor deskNovember 18, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा मतपत्रिकेवरील अनुक्रमांक नंबर ०२ असून निशाणी कमळ आहे. म्हणून मतदारांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता अनुक्रमांक नंबर २ आणि निशाणी कमळ लक्षात ठेवायचं आहे असे आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मतदारांना केले आहे.

    मतदानाला अवघे काहीच तास शिल्लक असतानाच उबाठा च्या प्रचार गाडीतुन अपक्ष डमी उमेदवार चव्हाण चे पत्रके वाटप करत असतांना शहरातील सुज्ञ नागरिकांनी या उबाठा च्या गाडीवाल्याला रंगेहाथ पकडले असून चालकाने तशी कबुली देखील दिली आहे की मशाल च्या ऑफिस मधून मला हे डमी उमेदवार चे पत्रके वाटप साठी देण्यात आले आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मिडियत जोरदार व्हायरल होत असून 2014 च्या निवडणुकीत देखील काही षडयंत्री लोकांनी मतदानाला काही तास बाकी असतानाच अपक्ष उमेदवार स्व.पप्पूदादा गुंजाळ यांनी यांनी पाठिंबा दिल्याची अफवा पसरवली होती. म्हणून आजचा प्रकार समोर आल्याने आता पुन्हा 2014 ची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे का षडयंत्री लोकांकडून??? अशी चर्चा जोर धरत आहे. विरोधकांकडून जाणून बुजून अनुक्रमांकाबाबत अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. चाळीसगाव मतदारसंघात विकासकामांमुळे विद्यमान आमदार मंगेशदादा चव्हाण यांची एक क्रेझ निर्माण झाली असून विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने मतदारांमध्ये अफवा पसरवायला सुरुवात केली आहे. येत्या चोवीस तासांत अजून अशाच प्रकारे विरोधकांकडून काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो म्हणून मतदारांनी सावध रहावे व अफवांना बळी न पडता सदसद्विवेकबुद्धीने विकासकामे डोळ्यासमोर ठेवून मतदान करावे असे देखील आवाहन यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.