Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी : युवकांच्या मोठ्या सहभागात महायुतीच्या रॅलीला प्रतिसाद
    Uncategorized

    ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी : युवकांच्या मोठ्या सहभागात महायुतीच्या रॅलीला प्रतिसाद

    editor deskBy editor deskNovember 18, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव (प्रतिनिधी) : ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, युवकांच्या मोठ्या सहभागाने भाजप शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दि. १७ नोव्हेंबर रोजी दिवसभरात बळीराम पेठ, शनिपेठ, छ.संभाजीनगर, समता नगर, नेहरूनगर भागात रॅली काढली. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी नागरिकांना अभिवादन करीत त्यांचे आशीर्वाद घेतले व भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

    सकाळी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात आ. राजूमामा भोळे यांनी जिल्हा परिषदेच्या पत्र्या हनुमान मंदिर येथून प्रचार सुरु केला. त्यानंतर तहसील कार्यालय गल्ली, ब्राह्मण सभा गल्ली, गुरुनानक नगर, काट्या फाईल, गवळीवाडा, बळीराम पेठ मार्गे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या घरी भेट देऊन समारोप केला. दरम्यान, आ. राजूमामा भोळे यांनी माजी उप महापौर करीम सालार, दिवंगत हाजी गफार मलिक यांच्या घरी भेट दिली.मार्गात नागरिकांनी पुष्पहार घालून, महिला भगिनींनी औक्षण करीत भरभरून आशीर्वाद दिले.

    तर दुपारी दुसऱ्या टप्प्यात समता नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून प्रचार रॅली काढली. तेथून देवेंद्र नगर परिसर, संभाजी नगर, नित्यानंद नगर, त्र्यंबक नगर परिसर, मोहन नगर, नेहरू नगर मार्गे जीवन मोती सोसायटी येथे समारोप करण्यात आला. मार्गात जेष्ठ नागरिकांशी भेटीगाठी करून महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी राहण्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आवाहन केले.

    दोन्ही रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भारतीताई सोनवणे, चेतन सनकत, मुकुंदा सोनवणे, जितेंद्र मराठे, सुरेखा तायडे, शिवसेनेचे ज्योती चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख फिरोज शेख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजप मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, मंडळ क्र. ९ चे अध्यक्ष महेश कापूरे, भाजप अल्पसंख्याक महानगराध्यक्ष अशफाक खाटीक, जगदीश नेवे, कल्पेश सोनवणे, नीलेश तायडे, शुभम तायडे, शालिक सपकाळे, संदीप ढंढोरे, प्रमोद नगरकर, उदय भालेराव, प्रमोद नगरकर, सचिन दुनाखे, अश्विन भोळे, ललित भोळे, रुपेश पाटील, आशिष जोगी, ललित परदेशी, गजानन परदेशी, प्रेमल पटेल, सुरज पवार, अशोक ढंढोरे, सुभाष बेंडवाल, सुभाष जावळे, माणिकचंदजी जावळे, कल्लू बारसे, संजय ढंढोरे, सुभाष चव्हाण, शिवसेनेचे पियुष कोल्हे, कुंदन काळे, स्वप्नील परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साजिद पठाण, कौसर काकर, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, फैजान पटेल, कामिल शेख, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे, नाना भालेराव, अक्षय मेघे, लोक जनशक्ती पक्षाचे मनोज निकम, आनंदा सोनवणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज ठाकरेंना दिला मंत्री सामंतांनी युती बाबत सल्ला !

    October 13, 2025

    जिल्ह्यात खुनाची मालिका संपेना : रात्रीच्या सुमारास तरुणाच्या खुनाने पुन्हा जिल्हा हादरला !

    October 6, 2025

    स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या !

    September 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.