लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जामनेर विधानसभा मतदारसंघात राज्याचे संकट मोचक चांगलेच अडचणीत सापडले असून केवळ 11000 फूलीच्या भरोसे तक दुरून उभे आहेत. मात्र मतदार हा संकट मोचकाचा कष्टाचा पैसा घेऊन तुतारी वाजवणार असल्याचे बोलले जात आहे.
मतदार संघात अनेक लोक संकट मोचकाचे स्टेटस ठेवतात आणि अंतर्गत सुर मात्र लावत आहे तुतारी वाला माणूस पाहिजे. असे चित्र या मतदारसंघात निर्माण झाले आहेत. स्टेटस लावणं म्हणजे कोणीही बगलबच्चे संकट मोचकाजवळ आपल्याविषयी कान भरणार नाहीत व आपल्याला त्रास होणार नाही म्हणून स्टेटस लावून अंतर्गत फील्डिंग लावली जात आहे.
सामाजिक गणित या मतदारसंघात बिघडलेले आहे अनेक लोक लांब चालले गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अटीतटीची लढत त्या शंभर टक्के होईल मात्र एखाद्या वेळेस या मतदारसंघात संकट मोचकाला धोका देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.
जेके, अरविंद, जितू, रामू या चौकटीच्या बोरसे राजकारण सुरू आहे आणि समाज प्रचंड यांच्यावर नाराज आहे यामुळे संकट मोचकाला कात्रजचा घाट दाखवला तर नवल वाटू देऊ नका असे चित्र या मतदारसंघात निर्माण झालेले आहे. असा मी पाटील एकत्र झाले आहेत आणि सोबत अनेक सामाजिक जोड मिळालेले आहे आता कितपत संकट मोचक यशस्वी होतात याकडे लक्ष लागून आहे.