लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील मु.जे. महाविद्यालय समोरील भोईट मार्केटमध्ये थकबाकीदार असलेले २४ गाळे महापालिकेच्या वसुल व अतिक्रमण पथकाने गुरूवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता सील करण्यात आले. यावेळी जिल्हा पेठ पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भोईटे मार्केट मधील संपूर्ण गाळे सील करण्यात आले आहेत. ही कारवाई महसूल उपायुक्त प्रशांत पाटील, अतिक्रमण विभाग उपायुक्त श्याम गोसावी, किरकोळ वसुली अधीक्षक नरेंद्र चौधरी, संजय ठाकूर, गौरव सपकाळे, सुकदेव बाविस्कर, संजय दाभाडे, राजू शिंदे, किशोर सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. गाळे सील करण्याची कारवाई दुपारी १२ वाजता सुरु करण्यात आली. वेळोवेळी थकबाकी भरण्यासंदर्भात आवाहन करून देखील भोईटे मार्केट मधील गाळेधारकांनी ती न भरल्याने आज संपूर्ण मार्केटच सील करण्यात आले. भोईटे मार्केट मधील गाळेधारकांना थकबाकी भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. मात्र, भोईटे मार्केटमधील एकही गाळेधारकांने ही थकबाकी अंतिम मुदतीपर्यंत न भरल्याने आज संपूर्ण मार्केट सील करण्यात आले आहे. जवळपास २.५ कोटींची थकबाकी या गाळेधारकांकडे थकीत होती. संपूर्ण मार्केट सील करण्याची कारवाई महापालिकेकडून प्रथमच करण्यात आली असल्याने गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.