• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जयश्रीताई तुम आगे बढो… महिलांनी केला जयश्रीताईंच्या विजयाचा संकल्प…

editor desk by editor desk
November 14, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य
0
जयश्रीताई तुम आगे बढो… महिलांनी केला जयश्रीताईंच्या विजयाचा संकल्प…

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीला आज (दि. १४) छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून जोरदार सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयघोषात रॅलीची सुरुवात करण्यात आली. समर्थकांच्या जोशपूर्ण घोषणा आणि महाराजांच्या जयघोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण तयार झाले.

आज बाल दिनानिमित्त जयश्री महाजन यांनी रॅली दरम्यान लहान मुलांशी दिलखुलास गप्पा मारल्या. लहानग्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना, त्यांनी त्यांच्या गप्पांतून मुलांशी जिव्हाळ्याचे नाते जुळवले. मुलांसोबत फोटो काढताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद विशेष उल्लेखनीय होता. बालगोपाळांची जिद्द, ऊर्जा, आणि चिकाटी हीच खऱ्या नेतृत्वाची ओळख असल्याचे मत जयश्री महाजन यांनी व्यक्त केले.

रॅलीदरम्यान जयश्री महाजन यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. नागरिकांच्या अडचणींना तत्परतेने उत्तर देत त्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. मतदारांना आवाहन करताना, निवडणुकीच्या दिवशी अनुक्रमांक दोन वर ‘मशाल’ चिन्हासमोरचे बटण दाबून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन जयश्री महाजन यांनी केले. “तुमच्यासाठी सेवा करण्याची संधी मिळावी, हाच माझा एकमेव उद्देश आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

या प्रचार रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिवसेना नेते विजय बांदल, विजय राठोड, यश उपाध्ये, सागर उपाध्ये, पंकज व्यास, संजय सांगळे यांसह महिला आघाडीच्या महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगरप्रमुख निता सांगोळे, तसेच जया तिवारी आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी रॅलीत भाग घेतला. शिवाय महाविकास आघाडीचे अन्य नेते आणि जळगाव शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीने जळगाव शहरातील वातावरणात एक नवा उत्साह भरला आहे. त्यांच्या विजयासाठी महिलांनी कटिबद्ध असल्याचे रॅलीत स्पष्ट दिसले.

Previous Post

रोहिणी खडसे यांना गावागावांत मिळणारा प्रतिसादातून त्यांच्या विजयाचा दावा पक्का

Next Post

घरामध्ये धार्मिक शुभ कार्य होण्याची शक्यता

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

घरामध्ये धार्मिक शुभ कार्य होण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group