Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » टपरीवाला २३ तारखेनंतर तुम्हाला विधानसभेत दिसणार नाही
    जळगाव

    टपरीवाला २३ तारखेनंतर तुम्हाला विधानसभेत दिसणार नाही

    editor deskBy editor deskNovember 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक टपरीवाल्यांना आमदार, खासदार व मंत्री केले. पण हा टपरीवाला शेवटी लायकीवरच गेला. त्याला घरी बसविण्याची वेळ आता आली असून, २३ तारखेनंतर तो तुम्हाला विधानसभेत दिसणार नाही, अशी टीका शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी धरणगावात केली.

    महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ धरणगावातील कोट बाजार भागात शिवसेना कार्यालयासमोर आयोजित जाहीर सभेत खा.राऊत यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारावर जोरदार टीका केली. पाणीपुरवठा खात्याचे मंत्री असताना गुलाबराव पाटील धरणगावकरांना पुरेसे पाणी देऊ शकत नाही. त्यांना दारूत टाकायला पाणी मिळते, लोकांना मात्र पाणी मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. त्यांनी धरणगावात उद्योग आणले नाही पण सट्टा, पत्ता, वाईन शाॅप आणले. मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंचे पाय धरत होते, एका क्षणात सगळे विसरून सुरतमार्गे गुवाहाटीला पळून गेले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात निष्ठेच्या मोठ्या गप्पा मारायचे. या टपरीवाल्याला बाळासाहेबांनी मोठे केले म्हणून छाती ठोकून सांगायचे. आज गद्दारी केल्याने ते निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. त्यांना तोंड लपवत फिरावे लागत आहे, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

    धरणगाव शहराचा कायापलट करणार : गुलाबराव देवकर
    गेल्या १० वर्षात विकासाचे कोणतेही व्हीजन नसलेल्या नेतृत्वामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. धरणगावात २० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तरूणांच्या हाताला रोजगार नाही. अनेक बेरोजगार कामासाठी जळगावला जाताना दिसतात. अवैध धंद्यांना सगळीकडे ऊत आला आहे. बेसुमार वाळू उपाशामुळे नद्यांची पात्रे पोखरली गेली आहेत, याकडे लक्ष वेधून सेवेची संधी मिळाल्यास सर्वप्रथम धरणगाव शहराची पाणी टंचाई दूर केली जाईल. एखादा मोठा उद्योग आणून धरणगाव तालुक्याचा कायापलट केला जाईल, असे आश्वासन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिले.

    यांची होती प्रमुख उपस्थिती
    यावेळी उद्धव सेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, कृऊबासचे माजी सभापती लक्ष्मण पाटील (लकी टेलर), उपजिल्हा प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, धरणगाव तालुका प्रमुख जयदीप पाटील, महिला तालुका प्रमुख जनाबाई पाटील, जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी व दीपक वाघमारे, उद्योजक सुरेश चौधरी, माजी जि.प.उपाध्यक्ष जानकीराम पाटील, संतोष सोनवणे, नाना ठाकरे, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक अध्यक्ष मनोज पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे धरणगाव शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.