बोदवड (प्रतिनिधी) : माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी तीस वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकासाला प्राधान्य दिले तिस वर्षात कुठेही सामाजिक तेढ निर्माण झाली नाही, कुठेही खंडणी, दादागिरी गुंडगिरीचे प्रकार घडले नाहीत परंतु गेले पाच वर्षात काही लोकांनी मतदासंघांचे वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना आपल्याला मतदानातून उत्तर द्यायचे आहे, असे प्रतिपादन माजी सरपंच कैलास चौधरी यांनी केले. ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या बोदवड भागात ॲड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील, उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या जनआशिर्वाद पदयात्रे दरम्यान ते बोदवडवासियांशी संवाद साधत होते.
यावेळी माजी सरपंच कैलास चौधरी यांनी नागरिकांशी संवाद साधताना पुढे सांगितले की, मतदारसंघातील गेल्या पाच वर्षापासून अशांतता, गुंडगिरीचे वातावरण संपवून शांतता, जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी नाथाभाऊ यांचा विकासाचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उच्चशिक्षित उमेदवार ॲड रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे माजी सरपंच कैलास चौधरी यांनी नागरीकांना आवाहन केले आ. एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्यासाहेब पाटील आदी जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शाखाली रोहिणी खडसे या बोदवड शहराचा व मुक्ताईनगर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करतील, अशी कैलास चौधरी यांनी नागरीकांना ग्वाही दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.