Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चौधरी बंधूंचा सुतगिरणीत महाघोटाळा, अमळनेरकरांच्या स्वप्नांचा केला चुराडा
    अमळनेर

    चौधरी बंधूंचा सुतगिरणीत महाघोटाळा, अमळनेरकरांच्या स्वप्नांचा केला चुराडा

    editor deskBy editor deskNovember 12, 2024No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    शेतीला पाणी आणि हाताला काम देण्याचे आश्वासन माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू रविंद्र चौधरी यांनी दिले होते. यासाठी अमळनेर तालुक्यात दोन वर्षात सुतगिरणी उभारून हजारो तरुणांना रोजगार देण्याचा शब्द दिला होता. परंतु या दोन्ही बंधूंनी मिळून दहा वर्षात सुतगिरणी तर उभारलीच नाही पण त्यासाठी आलेले १८ कोटीवरील शासकीय भागभांडवल, त्यावरील १४ लाखांचे व्याज, सभासदांचे ९३ लाखांचे भागभांडवल आपल्या घशात घालून स्वतःचेच उखळ पांढरे करून घेतले आहे. त्यांनी हा नुसता घोटाळा केला नसून महाघोटाळा करून अमळनेर जनतेच्या भावानांशी खेळ केला आहे, त्यामुळे त्यांना आता जनता माफ करणार नाही, यात खोटे असेल तर त्यांनी भर चौकात याचे उत्तर द्यावे, असे आव्हान ही मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे.

    मंत्री अनिल पाटील म्हणाले की, अमळनेर मतदार संघात २०१४ मध्ये स्वतः नंदपुत्र म्हणत चौधरी बंधूंनी नागरिकांच्या भोळ्या भाबळ्या स्वभावाचा फायदा उचलून निवडणूक लढवली. या वेळी येथील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुतगिरीणी सुरू करण्याचे आश्वासन दिले. म्हणून त्यांच्या भुलथापांना बळी पडून येथील नागरिकांना त्यांना निवडून दिले. निवडून आल्यावर तीन वर्ष काहीच केले नाही. आपल्याला थापाड्या म्हणू नये म्हणून त्यांनी शेवटी शेवटी म्हणजे ७ जून २०१७ मध्ये अकोल्याची १९९२ मध्ये नोंदणी झालेली वसंतराव नाइक सहकारी सूतगिरणी विकत घेतली. तिचे राजमाता जिजाऊ शेतकरी सहकारी सुतगीरणी असं नामकरण करून अमळनेर क्षेत्र निश्चित केले. यासाठी तालुक्यातील नंदगाव शिवार येथे सुतगिरणी उभारण्यासाठी जमीनही घेतली. या सुतगिरणीची नोंदणी १९९२ मध्ये झाली असली तरी तिने कोणतेही शासकीय भागभांडवल घेतेले नव्हते. त्यामुळे याचा फायदा उचलच चौधरी बंधूंनी हालचाली सुरू केली. तोपर्यंत २०१९ ची विधानसभा निवडणूक लागली. यातही सुतगिरीणीचे गाजर त्यांनी मतदरांना दाखवले. परंतु त्यांना कोणीही बळी पडले नाही. आणि मतदारांनी त्यांना नंदुरबारचा रस्ता दाखवला. निवडणुकीनंतर ते पावणे पाच वर्ष नंदुरबारला गेले तर अमळनेरच्या जनतेकडे त्यांनी ढुंकूणही पाहिले नाही. पुन्हा वर्षभरापूर्वी निवडणुकीची तयारी म्हणून शासकीय भागभांडवल मंजुरी करण्यासाठी ३१ मार्च २०२३ रोजी जीआर काढून आणला. त्यानुसार सुतगिरणीस १८ कोटी २० लाख २५ हजार रुपयांचे शासकीय भागभांडवल मंजूर करण्यात आले. तर नंदुरबार जिल्ह्यातील तत्कालीन उपजिल्हाधिकारी तसेच जळगांव चे तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी मंजुर असलेल्या १८ कोटी २० लाख २५ हजार रुपयांचे शासकीय भागभांडवल १३ एप्रिल २०२३ रोजी सुतगिरणीच्या आयडीबीआयच्या खात्यात वर्ग झाले आणि त्यांची नियत फिरली. सर्वसामान्य जनतेला काहीही कळत नाही म्हणून या महाठगांनी ही सुतगिरीणी कशी लुटली याची सारे पुरावे आहेत.

    शासनाच्या पैशांवरही कमवले व्याज

    चौधरी ठग बंधूंनी शासकीय भाग भांडवलाची जी १८ कोटी २० लाख २५ हजार रुपयांची आयडीबीआय बँकेत रक्कम पडली होती. त्याची २९ जून २०२३ रोजी तीन एफडी बनवल्या. त्यात ३ कोटी २० लाखाची एक आणि ५ कोटींच्या ३ अशा एफडी ५० दिवसांसाठी केल्या. या ५० दिवसांत सर्व एफडी बंद केल्याने त्यांना १४ लाख १३ हजार २५१ रुपयांचा व्याज मिळाले. पैसा शासनाचा आणि व्याज चौधरी बंधूंनी कमवले. तसेच सुतगिरणीचे ९३ लाखांचा भागभांडवलही होते. ऐवढा पाहून त्यांची नियत फिरल्याने येथूनच महाघोटाळ्याला चौधरी बंधुंनी सुरुवात केली.

    कोल्हापूरच्या यड्राव बँकेला ९० लाख का दिले

    सुतगिरणीचे सभासद भागभांडवल आणि शासकीय भागभांडवल बँकेच्या खात्यात पडल्यावर सुतगिरणीच्या कामाला सुरुवात करणे अपेक्षित होते. परंतु या चौधरी बंधूनी सुतगिरणी उभारण्या ऐवजी हा पैसा वेगळ्या मार्गाने वळवून त्याची विल्हेवाट लावली आहे. यासाठी कोणाला भनक लागू नये म्हणून त्यांनी १८ ऑगस्ट २०२३ ला कोल्हापूरच्या यड्राव-को.ऑपरेटिव्ह बँकेला ९० लाख रुपये दिले, त्या बँकेचा चेअरमन अजय यड्रावकर आहे. त्यामुळे त्यांचा आणि सुतगिरीणाचा काय संबंध आहे. त्यांनी मशनरी घेण्यासाठी पैसे दिले असतील तर बँक काही मशनीरी विकत नाही, त्यामुळे एखाद्या वेंडरच्या नावाने पैसे देऊन ते वटवले असते तर समजू शकलो असतो. परंतु एखाद्या को-ऑपरेटीव्ह बँकेला देणे म्हणजे संशयास्पद आहे.

    ४६ हजारात उभारणार का सुतगिरणी

    ऐवढेच नव्हे तर त्यानंतर सुतगिरणीच्या खात्यातून दुसऱ्या बँकेत आरटीजीएस करीत अन्य पैसाही वळवला आहे. त्यामुळे सुतगिरणीच्या खात्यात केवळ ४६ हजार १६२ रुपयेच का शिल्लक ठेवले आहेत. सुतगीरणीचे स्वतंत्र खाते असतानाही अन्य बँकेत पैसा का वळवला. त्या पैशाचे तु्म्ही काय केले, कुठे वापरला, याचा हिशोब चौधरी बांधवांनो भरचौकात द्यावा लागेल. नाही तर समिती नेमा आणि चौकशी करा, म्हणजे तुमच्या कारणामाचे सत्य बाहेर येईल.

    दहा वर्षात एक वीटही रचली नाही

    अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथे सुतगिरीणीच्या नावाने जागा घेतली आहे. परंतु दहा वर्षात येथे एक विटही उभी राहिलेले नाही. त्यामुळे अमळनेकर तरुणाच्या स्वप्ननांचा चुराडा चौधरी बंधूंनी केला आहे. सुतगिरणी उभी राहण्याआधीच चौधरी बंधूंनी तिचा गळा घोटला आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मतदार बंधूनच आता त्यांना हद्दपार करतील, असा विश्वास आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नशिराबाद नगरपालिकेचा निकाल जाहीर; नगराध्यक्षपदी योगेश पाटील !

    December 21, 2025

    मुक्ताईनगरमध्ये सत्ता बदलाचा धक्का; रक्षा खडसे यांची प्रतिष्ठा पणाला, संजना पाटील विजयी

    December 21, 2025

    मोठी बातमी : मतमोजणीला सुरुवात, भाजप पुढे; महायुती 150 जागांवर आघाडीवर !

    December 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.