लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राजकारण ,समाजकारण किंवा पक्षीय संघटन यात एखाद्या चुकीच्या गाेष्टीला स्पष्टपणे नाही म्हणण्याची ताकत आण्णासाहेब डाॅ.सतीष पाटील यांच्यात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात शब्दाला पक्का, साहेबांचा निष्ठावंत आणि स्पष्टवक्ता अशी त्यांची ओळख झाली आहे. एखाद्या गाेष्टीला नाही म्हटले तर त्यांचा नाही कधीच हाेकारात बदलणार नाही, हे माहिती असल्याने अनेकांना त्यांच्यावर विश्वास टाकला. संघटनेत त्यांच्या नावामुळे शिस्त टिकून राहिली.
बेडधकडपणा, स्पष्टवक्तेपणा, निष्ठावान आणि कर्मसिद्धांती ही वैशिष्ट्ये असलेल्या अण्णासाहेब डाॅ.सतीष पाटील यांनी कधीही राजकीय नफा -नुकसानीचा विचार करून काेणते वक्तव्य केले नाही किंवा काेणत्या विषयावर काेणाकडे ठरवून प्रतिक्रिया दिली नाही. डाेक्यात शरद पवारांप्रति निष्ठा ठेवून जाे -जाे त्यांच्याविराेधात येईल त्याच्यावर ते बाेलले आहेत. विराेधकांना उरून पुरणारी ताेफ म्हणून त्यांची ओळख आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे त्यांच्यासाठी सर्वस्व आहे.साहेबांवर असलेल्या निष्ठेमुळेच ते पक्षात हक्काने काेणतीही भूमीका ठामपणे मांडू शकतात.एखाद्या न पाटणाऱ्या भुमीकेला विराेधही करू शकतात. स्पष्टवक्तेपणामुळे अनेक वेळा राजकीय नुकसान झाले तरी त्यांनी कधी त्याची पर्वा केली नाही.याच गुणधर्मामुळे आज त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची फाैज आहे.
संघटनेवर पकड….
जिल्हा राष्ट्रवादीचे सवाेत्कृृष्ट संघटन हे डाॅ.सतीष पाटील यांच्याच काळात झाले. समाेर मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंसारखे मंत्री असतांना देखील डाॅ.सतीष पाटील यांच्याकडे संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली हाेती. त्या काळात त्यांनी एकहाती संघटन वाढवले आणि टिकवले. त्यांच्या कार्यकाळात संघटनेत महिला, युवक, जेष्ठ ,शिक्षक अशा सर्व स्तरातील व्यक्तींनी त्यांना भररून प्रतिसाद दिला.
विराेधकांना धास्ती…..
जिल्ह्यात विधानसभेचा फड रंगलेला असतांना विराेधातील अनेकांना सतीष अण्णांची धास्ती घेतली आहे. हा माणूस आपल्या मतदारसंघात येवू नये म्हणून जिल्ह्यातील विराेधातील अनेकांनी त्यांना त्यांच्याच एरंडाेल-पाराेळा मतदारसंघात कसे अडकून ठेवता येईल यासाठी विराेधकांना मदत केली आहे. हवे नकाे ते सर्व देण्याची तयारी दर्शविली. फक्त अण्णांना इकडे येवू देवू नका ऐवढा धाक असलेली जिल्ह्यातील एकमेव व्यक्ती म्हणजे अण्णासाहेब आहेत.