• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी माझी उमेदवारी – धनंजय चौधरी

editor desk by editor desk
November 9, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी माझी उमेदवारी – धनंजय चौधरी

रावेर : प्रतिनिधी

रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांनी यावल तालुक्यातील दुसखेडा, कठोरा, कासवा, अकलूद येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

सकाळी गुलाबवाडी येथून सुरु झालेली प्रचारफेरी मोरव्हाल, विश्राम जिन्सी, जिन्सी, आभोडा खु., आभोडा बु., रमजीपूर, बक्षीपूर, खिरोदा प्र.रावेर, रसलपूर आदी भागातून काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधतांना धनंजय चौधरी यांनी तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत असून, मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला, आणि युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी, तसेच रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी, माझ्या ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याची विनंती केली.

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून अकलुद फाटा ते दुसखेडा पेपरमिल रस्ता डांबरीकरण, अकलुद ते आमोदा रस्ता डांबरीकरण तसेच कासवा येथे संत गंजानन महाराज मंदिराजवळ सभामंडप बांधकाम व गावातंर्गत काँक्रीटीकरण अशी विविध विकास कामे झालेली आहेत. अडीच वर्षे महायुती सरकारने कामे थांबविल्यामुळे निश्चितच काही कामे राहुन गेलेली आहेत, ती पूर्ण करण्यासह परिसराचा विकासाचा अनुशेष पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिला. प्रचार फेरीत त्यांच्यासमवेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

…पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक – डॉ.बी.सी.महाजन

Next Post

पारोळा तालुक्यातील 42 गावे देणार मंत्री अनिल पाटलांनाच साथ ; कार्यकर्त्यांचा विश्वास !

Next Post
पारोळा तालुक्यातील 42 गावे देणार मंत्री अनिल पाटलांनाच साथ ; कार्यकर्त्यांचा विश्वास  !

पारोळा तालुक्यातील 42 गावे देणार मंत्री अनिल पाटलांनाच साथ ; कार्यकर्त्यांचा विश्वास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group