• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

…पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक – डॉ.बी.सी.महाजन

editor desk by editor desk
November 9, 2024
in राजकारण, राज्य
0
…पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक – डॉ.बी.सी.महाजन

मुक्ताईनगर :  प्रतिनिधी

कुऱ्हा- कुंड धारणाची उंची वाढवण्याचा प्रश्न रोहिणी खडसे यांनी यशस्वी करून मार्गी लावला होता त्यांच्यामध्येपाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याची धमक आहे. कुऱ्हा वढोदा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्या पाठपुरावा करतील. कुऱ्हा परिसराने कायम आ.एकनाथराव खडसे यांना साथ दिली. आता रोहिणी खडसे यांच्या पाठीशी उभे राहून, त्यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन कुऱ्हा सरपंच डॉ.बी.सी. महाजन यांनी उपस्थित नागरिकांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांनी कुऱ्हा, थेरोळा, तालखेडा, उमरे, जोंधनखेडा, हिवरा, राजुरा, बोरखेडा, काकोडा पारंबी येथे जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मतदार संवाद दौरा काढून मतदारांशी संवाद साधून मतदारांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी बोलतांना डॉ.बी.सी. महाजन म्हणाले, कुऱ्हा वढोदा परिसरातील शेती सिंचित होऊन कोरडवाहू परिसर हिरवागार होऊन शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी आ.एकनाथराव खडसे यांनी कुऱ्हा वढोदा परिसर उपसा सिंचन योजना आणली. ती पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला परंतु द्वेषभावनेतून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधी मिळाला नाही. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी रोहिणी खडसे यांना मतदान करून विधानसभेत पाठवा. त्यासाठी पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक आहे. मागील काळात रोहिणी खडसे यांनी सतत पाठपुरावा करून जोंधनखेडा येथील कुंड धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा प्रश्न मार्गी लावला, हे आपण अनुभवले आहे. त्यांचा पारंबी, हिवरा, जोंधनखेडा, कुऱ्हा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झाला. नाथाभाऊ यांचा विकासाचा वारसा पुढे नेऊन मतदारसंघाचा विकास करण्यासाठी रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे डॉ. बी.सी. महाजन यांनी आवाहन केले.

यावेळी विशाल महाराज खोले यांनी सांगितले की, कोरोना काळात कुऱ्हा येथे लोकसहभागातून कोविड केअर सेंटर उभारणीसाठी रोहिणी खडसे यांनी पुढाकार घेतला होता. सेंटर सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. स्वखर्चातून कोविड सेंटर साठी तीस बेड आणि मास्क औषधे उपलब्ध करून दिले. रोहिणी खडसे या जनतेच्या सुखदुःखात धावून येणाऱ्या सर्वसामान्य उमेदवार असून त्यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हसमोरील बटण दाबून त्यांना विजयी करा.
गेल्या तीस वर्षांपासून आ.एकनाथराव खडसे हे कुऱ्हा वढोदा परिसराच्या उन्नतीसाठी झटत आहेत पहिल्यांदा मुक्ताईनगरचे आमदार झाल्यानंतर त्यांनी कुऱ्हा परिसराला पक्क्या डांबरी रस्त्यांनी जोडले. कुऱ्हा परिसराचा पूर्वी पावसाळ्यात पुरामुळे मुक्ताईनगर परिसराशी संपर्क तुटत होता. नाथाभाऊंनी सर्व नदी नाल्यांवर लहान मोठया पुलांची निर्मिती केली. धुपेश्वर पुलाची निर्मिती करून कुऱ्हा परिसराला मलकापूरसोबत जोडले. त्यामुळे दळणवळण सोयीचे होऊन व्यापार वाढला, नातेसंबंध जवळ आले. नाथाभाऊ यांनी इको टुरिझम अंतर्गत वढोदा येथील मच्छिन्द्रनाथ संस्थान आणि चारठाणा येथील भवानी माता मंदिर परिसरात भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या.
प्रत्येक गाव खेड्याला डांबरी रस्त्यांनी जोडून गावागावात सभागृह, अंतर्गत रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा सारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून रोहिणीताई खडसे या समाजकारणातून राजकारण करत असून नाथाभाऊ यांनी मतदारसंघात आणलेली विकासाची गंगा प्रवाहित करण्यासाठी त्या सक्षम उच्चशिक्षाविभूषित उमेदवार असून मतदारसंघाचे प्रश्न त्या सक्षमपणे विधानसभेत मांडून सोडवू शकतात. म्हणून आपण सर्वांनी त्यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन बाजार समितीचे माजी सभापती निवृत्ती पाटील यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

 सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी एकवटली नारीशक्ती : मतदारसंघ पिंजून काढत घेतली प्रचारात घेतली आघाडी !

Next Post

रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी माझी उमेदवारी – धनंजय चौधरी

Next Post
रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी माझी उमेदवारी – धनंजय चौधरी

रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी माझी उमेदवारी - धनंजय चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group