पारोळा प्रतिनिधी । पारोळा-एरंडोल मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोलदादा पाटील यांना अखिल भारतीय मराठा महासंघाने पाठींबा दिला आहे. याबाबत संघाच्या वतीने पत्र देवून आमदार चिमणआबा पाटील यांना देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.दिलीप पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, जिल्हा सदस्य अमोल पाटील, शेखर पाटील यांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांची भेट घेवुन जाहीर पाठींबा बाबतचे पत्रक सुपुर्द केले. प्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे एरंडोल विधानसभा अध्यक्ष कुणालभाऊ महाजन उपस्थित होते.