Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » “गुलाबराव पाटलांचे गावोगावी जंगी स्वागत” ! – विकास कार्यांवर जनतेचा विश्वास
    जळगाव

    “गुलाबराव पाटलांचे गावोगावी जंगी स्वागत” ! – विकास कार्यांवर जनतेचा विश्वास

    editor deskBy editor deskNovember 7, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    “ग्रामविकास हेच माझे ध्येय असून गावकऱ्यांचे मिळत असलेले प्रेम व आशीर्वाद हिच माझ्या कार्याची खरी ओळख असून मी जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी जनतेशी संवाद साधताना केले. धामणगाव, खापरखेडा, नांद्रा खुर्द, सुजदे, देऊळवाडे येथे गुलाबराव पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेषतः लाडक्या ग्रप – ग्रुप ने बहिणींनी त्यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा देत आहे. सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ. प. जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, रिपाईचे अनिल अडकमोल, भाजपचे राजू सोनवणे, अनिल सोनवणे, मन्नूभाऊ सोनवणे होते.

    गुलाबराव पाटील यांनी या परिसरात केलेल्या सर्वांगीण विकास कामांच्या जोरावर गावकऱ्यांमध्ये अपार विश्वास दिसून येत आहे. गावांमध्ये पाणीपुरवठा सह गावं अंतर्गत मूलभूत सुविधांसह शाळा, अंगणवाड्या, आरोग्य सेवा आणि रस्त्यांची सुधारणा अशा विविध कामांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत आहे.

    मुख्य आकर्षण :
    भवरखेडा येथे गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात उघड्या जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जयघोष आणि जल्लोषाने वातावरण भारलेले होते. गावकऱ्यांच्या या उत्साहाने आणि समर्थनाने गुलाबराव पाटील यांनी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

    यांची होती उपस्थिती
    याप्रसंगी सरपंच निशिगंधा सपकाळे, अनिल उर्फ गुड्डू भाऊ सपकाळे, गलू सपकाळे, अमोल सोनवणे, गोकुळ सपकाळे, राजू सोनवणे, गणेश भालेराव, पुंडलिक पाटील, शांताराम पाटील, चंपालाल पाटील, सुरेखा सोनवणे, योगेश सपकाळे, किरण सपकाळे, अनिल मंडोरे , वासुदेव सोनवणे, प्रल्हाद पाटील, रविंद्र सोनवणे, मुकेश सोनवणे, सरपंच सुनील सोनवणे, आकाश सोनवणे, विजय सोनवणे, यांच्यासह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.