लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत 70 हजार मतं माशाल्ला मिळाली होती. परंतु हे मत आता टिकतात की नाही ही शंका निर्माण झाले आहे यातील प्रमुख कारण म्हणजे मशाल मध्ये असलेली गट बाजी व जळगाव शहरातील मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांनी मशालच्या उमेदवाराविषयी व्यक्त केलेली नाराजी पुढे येत आहे.
यामुळे मशालला लोकसभेचे मत टिकूनही अवघड परिस्थिती निर्माण झाले आहे. मशाल चे उमेदवार सामाजिक गणितात आहेत परंतु आतून सर्व पोखरल गेले आहे अशी स्थिती असून महापालिकेचे राजकारण देखील याला कारणीभूत आहे मेहरून मध्ये तर हिंदू मुस्लिम मतांची विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फार काही चांगली स्थिती मशाल आहे असे चित्र मात्र अजिबात नाही आगामी पाच दिवसात हे पीच कसे भरून काढणार याकडे लक्ष लागून आहे. तूर्तास मशाल्ला कुठलीही सहानुभूती जळगाव शहरात मराठा नेत्यांकडून मिळत नसल्याने धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.