Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुलाबभाऊंचा आदिवासी बांधवांकडून ‘धनुष्यबाण’ सन्मान, शेतकऱ्यांसह भव्य बैलगाडी प्रचार रॅलीने शक्तिप्रदर्शन !
    जळगाव

    गुलाबभाऊंचा आदिवासी बांधवांकडून ‘धनुष्यबाण’ सन्मान, शेतकऱ्यांसह भव्य बैलगाडी प्रचार रॅलीने शक्तिप्रदर्शन !

    editor deskBy editor deskNovember 7, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शिवसेनेचे नेते आणि महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचा आदिवासी बांधवांनी ‘धनुष्यबाण’ देऊन त्यांचा सन्मान केला. हा सन्मान त्यांच्या सततच्या जनसंपर्कातल्या घनिष्ठतेचे आणि जनतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे प्रतीक मानले जात आहे. बिलखेडा येथे शेकडोआदिवासी बांधवांनी व शेतकऱ्यांनी धनुष्यबाण भेट देवून तसेच शिवसेनेचे झेंडे आणि कट-आउट्सने सजविलेल्या बैलगाडीत गुलाबभाऊंना उभे करून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. विकासाचे व्हिजन म्हणजे धनुष्यबाण” साठी शेतकरी व आदिवासीं बांधव यावेळी एकवटलेचे दिसून आले. बोरगाव बु. येथे 32 केव्हीचे वीज उपकेंद्र उभारण्यात आल्याने परिसरातील वीज समस्या कायमस्वरूपी सुटली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी नागिन नदीवर 1.75 कोटी रुपयांचे क्रॉसिंग पूल उभारण्यात आल्याने संपूर्ण परिसरातील शेतकरी व नागरिकांना फायदा झाला आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालये आणि अन्य विकास कामे प्रभावीपणे राबविण्यात आल्यामुळे शेतकरी वर्गाने उत्स्फूर्तपणे गुलाबराव पाटील यांच्या बाजूने समर्थन दर्शवले. गुलाबभाऊंना गावोगावी जोरदार पाठिंबा मिळत आहे.

    गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वातील विकास कामांमुळे ग्रामीण भागातील जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि प्रेम उघडपणे दिसून आले. भोणे,बिलखेडा, जांभोरा, सार्वे, बांभोरी बु., बोरगाव बु., भवरखेडे, विवरे व बोरगाव खु. येथिल रॅलीत शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने पाटील यांच्या जनाधाराची ताकद स्पष्ट झाली. बैलगाडीत सजविलेल्या रॅलीतून गुलाबभाऊंचे स्वागत आणि समर्थन हा त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास दर्शवणारा आहे हे पुन्हा सिद्ध झाले.

    या प्रसंगी रॉ. काँ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शेखर अत्तरदे, संजय पाटील सर, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नाटेश्वर पवार, तालुकाध्यक्ष शामकांत पाटील, माजी सभापती प्रेमराज बापू पाटील, सुभाष पाटील, प्रेमराज पाटील, रवि चव्हाण सर, शिवदास पाटील, किशोर पाटील , निंबा पाटील, भदाणे गुरुजी, भैया मराठे सर, दिपक भदाणे, गणेश धिंगाणे, अमोल सोनवणे, रामदास पाटील, शुभम चव्हाण, कल्पनाताई अहिरे, दिनेश पाटील, अरविंद मानकरी, वाल्मीक निंबा कंखरे सोनवणे, मोहन भिल, चंदन भिल, दीपक भिल, मनीष भिल सरपंच बाळू पाटील उषाताई मराठे, हेमंत पाटील, डॉ. संदीप भदाणे,सरपंच उगलाल पाटील, गिरीश पाटील, भूषण महाजन, पिंटू पाटील, दिलीप माळी, मुन्ना पाटील, स्वप्निल पाटील, यांच्यासह भोणे,बिलखेडा, जांभोरा, सार्वे, बांभोरी बु., बोरगाव बु., भवरखेडे, विवरे व बोरगाव खु. येथील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अबाल वृद्धांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    आजचा प्रचार दौरा – 7 नोहेंबर 2024
    जळगाव तालुक्यातील धामणगाव येथे सकाळी 8.00 वा., खापरखेडा स. 9:00 वा, नांद्रा खु. स. 9.30 वा, देऊळवाडे स.10.30, सुजदे – सकाळी – 11.30 वा. , त्यानंतर भोलाणे येथे दुपारी 12.00 ते 3.00 वाजेपर्यंत विश्रांती राहणार असून भोलाणे येथे दुपारी 4.00 वा, कानसवाडे – संध्या.5.00 वा., शेळगाव – संध्या. 6.30 वाजता प्रचार रॅली असल्याने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुती मार्फत करण्यात आले आहे.

    तरसोदच्या सरपंच पतीसह कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश : हाती घेतला धनुष्यबाण

    तरसोद मधून लीड देणार – निलेश पाटील
    युवा नेते तथा मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते तरसोद येथिल सरपंच पती निलेश पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य सारंग कोळी, संतोष कोळी, महेंद्र कोळी, निलेश कोळी, गणेश पाटील, मिलिंद सुरवाडे , सागर कोळी, किरण कुंभार, वासुदेव धनगर, निलेश ठाकरे, तुषार काळे, सागर राजपूत, बब्बू बऱ्हाटे, रोहन राजपूत, धीरज राजपूत, चेतन राजपूत, वासुदेव रा यांनी प्रवेश करून हाती धनुष्यबाण घेताला आहे. गुलाब भाऊंच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून जास्तीत जास्त लीड तरसोद गावातून दिला जाईल असे निलेश पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी तरसोद येथील संतोष देवरे, पाळधी येथील प्रकाश धनगर, आबा इंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.