Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमात अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली जनसुनावणी
    जळगाव

    ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमात अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली जनसुनावणी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 8, 2022Updated:February 8, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत प्राप्त तक्रारीची जनसुनावणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी घेतली.यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांची उपस्थिती होती.

    श्रीमती चाकणकर म्हणाल्या कि, राज्य शासन महिला आयोगातर्फे अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी समिती कार्यरत आहे, जिल्ह्यात कोविड संसर्ग काळात विधवा, एकल महिलांच्या तसेच पालकत्व गमावलेल्या 20 मुलांना 5 लाख रुपये शासन स्तरावरून मदत देण्यात आली. 569 महिलांना लाभ देण्यात आला आहे. तसेच अन्य निराधार महिलांना शिलाई मशीन, रेशन लाभ, वृद्धापकाळ पेन्शन आदी लाभ देण्यात आले आहेत. शिवाय जिल्ह्यात 20 बालविवाह रोखण्यासाठी कारवाई देखील संबंधित विभागाकडून करण्यात आली. हे कार्य कौतुकास्पद आहे, परंतु सोलापूर 350 बालविवाह 18 वर्षे वय दाखवून लावून देण्यात आले, यात नोंदणी अधिकारी, उपस्थित असलेले समिती सदस्य यांच्यावर तात्काळ कारवाईचे केली जावी आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा अमलबजावणी केली जावी असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते, दिपीका चव्हाण, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्यासह आदी उपस्थित आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव बोलेरोने उडवली जीवांची राख; तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

    March 15, 2026

    नात्याला कालिमा : ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देवून अत्याचार !

    March 15, 2026

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.