Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ज्येष्ठ नागरिकांचे उपक्रम राबविण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद- प्रा.बी.व्ही.पवार
    जळगाव

    ज्येष्ठ नागरिकांचे उपक्रम राबविण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद- प्रा.बी.व्ही.पवार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 17, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ज्येष्ठ नागरिकांचे उपक्रम राबविण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे प्रतिपादन प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार यांनी केले.

    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने मंगळवार दि.१७ ते २१ ऑगस्ट,२०२१या कालावधीत ‘ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत’ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन विद्यापीठाच्या अधिसभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रा.बी.व्ही.पवार बोलत होते. यावेळी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांची ऑनलाईन अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. तहसीलदार जितेंद्र कुंवर, विभागाचे प्रभारी संचालक प्रा.मनिष जोशी यांची मंचावर उपस्थिती होती.

    लॉकडाऊनच्या काळात आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोलाचे काम केले. या नागरिकांच्या मदतीसाठी विद्यार्थी तयार व्हावेत म्हणून ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत प्रशिक्षण दिले जात असून याचा समाजाला निश्चित उपयोग होईल असे प्रा.पवार म्हणाले. तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन या योजना सहाय्यता दूतांमार्फत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहचाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविकात प्रा.मनिष जोशी यांनी हे शिबीर आयोजना मागची भूमीका सांगतांना या शिबीरात सहाय्यता दूताचे व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य, समुपदेशन अशा विविध पातळ्यांवर प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगीतले. ज्येष्ठ नागरिकांना अनेक पातळ्यांवर मदतीची गरज असते ती या दूतांमार्फत पुरविण्याचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुभाष पवार यांनी केले. यावेळी विभागाच्या अहवाल पुस्तीकेचे विमोचन करण्यात आले. उदघाटनानंतर प्रा.सौ.व्ही.व्ही.निफाडकर, धुळे, फेस्कॉम जळगावचे अध्यक्ष डी.टी.चौधरी व प्रा.विेवेक काटदरे यांनी मार्गदर्शन केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026

    २२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.