• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

या राशीतील लोकांचे आज ग्रहमान अनुकूल राहणार !

editor desk by editor desk
November 7, 2024
in राशीभविष्य
0
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !

मेष : आज धार्मिक यात्रेशी संबंधित योजनांचे नियोजन कराल. बहुतांश वेळ कुटुंबासोबत व्‍यतित केल्‍याने आनंद मिळेल. ज्येष्ठांचा सल्‍ला ऐका. विद्यार्थी अभ्यासाबाबत गंभीर असतील. अतिखर्चामुळे तणाव असू शकतो. दुपारनंतर परिस्थिती प्रतिकूल राहू शकते . कार्यक्षेत्रात सर्वोत्तम काम करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
वृषभ : तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला मनःशांती लाभेल. इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जा. सपंर्क क्षेत्र मजबूत करा. जुन्या मित्राच्या भेटीमुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. तुम्हाला सध्याचे नकारात्मक वातावरण टाळावे लागेल.

मिथुन : गुंतवणुकीसाठी काळ अतिशय अनुकूल आहे. घरातील बदलाबाबत चर्चा होईल. तुमच्या मार्गदर्शनाखाली मुले यश मिळवू शकतात. कुटुंबासोबत मनोरंजनातही वेळ जाईल. महत्त्‍वाच्‍या कामाकडे दुर्लक्ष करू शकता. याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवरही होऊ शकतो. हुशारीने आणि सावधपणे वागा. कार्यक्षेत्रातील रखडलेल्या कामांना वेग येईल.

कर्क : ग्रहमान अनुकूल होत आहे, असे संकेत श्रीगणेश देतात. आर्थिक स्थिती चांगली ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क प्रस्थापित होईल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. घरातील सदस्यांना अति हस्तक्षेपामुळे त्रास होऊ शकतो. पती-पत्नीचे नाते मधुर होईल.

सिंह : मालमत्ता खरेदी-विक्री संबंधित कामात तुम्हाला यश मिळेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. नातं गोड ठेवण्यासाठी तुमचं विशेष योगदान असेल. ताणतणावाऐवजी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. या काळात अनावश्यक प्रवास टाळा. कार्यक्षेत्रात व्यावसायिक उदासीनतेची स्थिती असू शकते.

कन्या : काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आज दूर होईल. आत्मविश्वासाने तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. तरुण त्यांच्या भविष्याबाबत अधिक सक्रिय होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळू शकतात. घरातील कोणतीही समस्या रागावण्याऐवजी शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात सुरू असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

तूळ : तुमची जीवनशैली अधिक प्रगत ठेवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या कामाला नवीन स्वरूप देण्‍याचा प्रयत्‍न कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी संबंधित कार्यात यश मिळू शकते. विवाहित व्यक्तींचे सासरच्या नातेवाईकांशी मतभेद होण्‍याची शक्‍यता. संयमाने परिस्‍थिती हाताळा, अन्यथा तुमची छाप खराब होऊ शकते. वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही.

वृश्चिक : आज तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला कामात व्यस्त असाल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळेल. सार्वजनिक व्यवहारात यश मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. अति कामामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो.

धनु : आज निकटवर्तीयांसोबत कोणत्याही विशेष विषयावर फायदेशीर चर्चा होईल. चुकीच्या कामांवर खर्च टाळा. तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका. मानसिक शांतता राखा. मान्यवरांबरोबर संबंध राखणे तुमच्या व्यवसायात फायदेशीर ठरेल, असे श्रीगणेश सांगतात.

मकर : आज काही लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात, तुम्ही काळजी न करता कार्यरत राहा. तुम्हाला यश नक्कीच मिळू शकेल. वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. अतिआत्मविश्वास टाळा. तुमच्यातील दोषांवर नियंत्रण ठेवा. घरातील वडिलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कार्यरत राहा. कार्यक्षेत्रातील बहुतेक कामे सुरळीत पार पडतील. रक्तदाबाच्‍या रुग्णांनी विशेष काळजी घ्‍यावी.

कुंभ : आज सामाजिक कार्यात तुमचे नि:स्वार्थ योगदान राहील. तुम्हाला मनःशांती मिळेल. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहणे चांगले. घर आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखले जाईल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्‍या.

मीन : आज आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. तुमच्या कार्यांना नवीन आकार देण्यासाठी अधिक सर्जनशील दृष्टीकोन स्वीकारा. जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. जवळच्या नातेवाईकाच्या वैयक्तिक जीवनात काही अडचणींमुळे चिंता होईल. विद्यार्थ्यांनी आळस टाळावा.

Previous Post

अजित पवारांनी प्रसिद्ध केला पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा

Next Post

गुलाबभाऊंचा आदिवासी बांधवांकडून ‘धनुष्यबाण’ सन्मान, शेतकऱ्यांसह भव्य बैलगाडी प्रचार रॅलीने शक्तिप्रदर्शन !

Next Post
गुलाबभाऊंचा आदिवासी बांधवांकडून ‘धनुष्यबाण’ सन्मान, शेतकऱ्यांसह भव्य बैलगाडी प्रचार रॅलीने शक्तिप्रदर्शन !

गुलाबभाऊंचा आदिवासी बांधवांकडून 'धनुष्यबाण' सन्मान, शेतकऱ्यांसह भव्य बैलगाडी प्रचार रॅलीने शक्तिप्रदर्शन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !
क्राईम

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !

July 7, 2025
ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !
राजकारण

ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !

July 7, 2025
राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !
कृषी

राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !

July 7, 2025
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !
राजकारण

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !

July 7, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

July 7, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

वृद्ध महिलेचा कपड्याने बांधून घरातून लांबविला मुद्देमाल !

July 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group