साहेब त्यांना मंत्री करणार : आमदार रोहित पवार यांचे आश्वासन !
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निष्ठावंतांच्या यादीत डॉक्टर सतीश पाटील यांचे नाव आहे तुम्ही त्यांना आमदार करा साहेब सतीश अण्णांना मंत्री करतील असे आश्वासन कासोदा येथील जाहीर सभेत आमदार रोहित पवार यांनी दिल्याने जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत रोहित पवार यांचा जयजयकार केला.
कासोदा येथील जाहीर सभेत रोहित पवार बोलताना म्हणाले की. शरद पवार यांनी अनेक वेळा आम्हाला जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत दोघा तिघांचे नाव घेताना डॉक्टर सतीश पाटील यांचे नाव त्यांच्या तोंडात कायम असते.
एरंडोल पारोळा तालुक्यातील जनतेने डॉक्टर सतीश पाटील यांना आमदार केले तर साहेब त्यांना शंभर टक्के मंत्रिपद देणार आहेत असे आश्वासन देत रोहित पवार म्हणाले की मतदार संघाचा विकास करण्यासाठी डॉक्टर सतीश पाटील यांना साथ द्या, डॉक्टर सतीश पाटील हे स्वभावाने साधे व सरळ मार्गे माणूस आहे मी या मतदारसंघातील उमेदवारांची यादी पाहता पक्ष म्हणून नाही बोलत परंतु सर्वात चारित्र्यसंपन्न उमेदवार व निष्ठावंत कुठेही विकला न जाणारा उमेदवार डॉक्टर सतीश पाटील हे आहे असा टोला विरोधकांना लगावत डॉक्टर सतीश पाटील हे मतदारांची निष्ठावंत राहतील म्हणून आपण त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आव्हान रोहित पवार यांनी केले.