लाईव्ह महाराष्ट्र न्युज : रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचारात तडवी समाज अंतर ठेवून असून तळवी समाज हा 2019 च्या निवडणुकीत काँग्रेससाठी महत्वपूर्ण ठरला होता आता मात्र तडवी समाज लांब गेल्याने रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार समोर अडचणीच्या डोंगर उभा राहिला आहे.
चोपडा मतदारसंघात ऐनवेळी तडवी समाजाचा उमेदवार महाविकास आघाडीने बदलवला, यावल येथे तडवी समाजाचा झालेला वाद आणि काँग्रेसच्या उमेदवाराने केलेला हस्तक्षेप यामुळे प्रचंड नाराज तरी समाज झालेला आहे, बामनोद येथे देखील तळवी समाज वादात अडकलेला आहे या सर्व वादाची किनार काँग्रेसच्या उमेदवारा भोवती असल्याने काँग्रेस पासून तळवी समाज जवळपास लांब गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एकंदरीत विधानसभेची रचना पाहता काँग्रेस समोर अडचणीचा डोंगर असल्याने अल्पसंख्यांक समाज देखील अंतर ठेवून आपली सुरक्षित बाजू सांभाळत आहे यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा वाटेत अनेक काटे उभे असल्याने ते काटे कसे काँग्रेसचे नेते सावरतात याकडे लक्ष लागून आहे. तडवी समाज पाठोपाठ मुस्लिम समाज ही प्रचंड नाराज असल्याचे चित्र या मतदारसंघात निर्माण झाले आहे. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराच्या शुभारंभ नाराजी नाट्य समोर आले आहे. रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आता अवघड चित्र निर्माण झाले आहे.