• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आ.राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा फुटला नारळ : प्रचार रॅलीमध्ये पहिल्याच दिवशी घेतली आघाडी

जुन्या जळगावात नागरिकांकडून पुष्पवृष्टी, महिला भगिनींकडून औक्षण

editor desk by editor desk
November 5, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
आ.राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा फुटला नारळ : प्रचार रॅलीमध्ये पहिल्याच दिवशी घेतली आघाडी

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा नारळ आज मंगळवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी जुन्या जळगावात ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात आला. यानंतर जुने जळगाव परिसरातील विविध भागांमध्ये जाऊन आ. राजूमामा भोळे यांची प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये जनतेमधून भरभरून प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी औक्षण करून तसेच पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.

जुने जळगाव परिसरातील विविध कॉलनीमध्ये महिला भगिनींनी आ.राजूमामा भोळे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक भागात आ. भोळे यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसून येत होता. प्रचार रॅलीत ‘कहो दिल से, राजूमामा फिर से’, एक, दोन, तीन, चार… राजूमामाच होणार आमदार’ अशा विविध घोषणा देण्यात आल्या.

रॅलीत खा. स्मिता वाघ, माजी महापौर सीमाताई भोळे यांचेदेखील महिला भगिनींनी औक्षण केले. गोपाळपुरा परिसरातील भोलेनाथ मंदिरामध्ये आ.राजूमामा भोळे यांनी पूजन करून आशीर्वाद घेतले. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे शुभाशीर्वाद घेऊन आ. राजूमामा भोळे यांनी प्रचार रॅलीमध्ये पहिल्याच दिवशी आघाडी घेतली.

रॅलीमध्ये भाजपाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, विधानसभा प्रमुख विशाल त्रिपाठी, राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी महापौर सीमाताई भोळे, शिवसेना शिंदे गटाचे महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी, माजी महापौर ललित कोल्हे, महानगर प्रमुख संतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लल्लन सपकाळे, लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, आनंदा सोनवणे प्रामुख्याने उपस्थित होते.

रॅलीमध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंदराव मेटकर, भागवत भंगाळे, माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष सुनील सरोदे, माजी उपमहापौर सुनील खडके, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, माजी नगरसेवक अजित राणे, मनोज काळे, डॉ.वीरेन खडके, डॉ. वैभव पाटील, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भारतीताई सोनवणे, गायत्री राणे, सरिता नेरकर, जितेंद्र मराठे, भगत बालाणि, राजेंद्र घुगे पाटील, प्रवीण कोल्हे, मुकुंदा सोनवणे, दीपमाला काळे, मनोज काळे, बंटी खडके, जयेश भावसार, ललित चौधरी, आशिष सपकाळे, राहुल वाघ, चित्रा मालपाणी, दीप्ती चिरमाडे, शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख राधेश्याम कोगटा, पियुष कोल्हे, माजी नगरसेवक ज्योती चव्हाण, गणेश सोनवणे, कुंदन काळे, महिला आघाडीचे शोभाताई चौधरी, आरपीआय आठवले गटाचे राजू मोरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात जनजागृतीसाठी व्हॉइस ऑफ मीडिया कडून फिरणार चित्र रथ  

Next Post

धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

Next Post
धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group