Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाऊबीजनिमित्त आ. राजूमामा भोळे यांचे महिलांनी केले औक्षण
    जळगाव

    भाऊबीजनिमित्त आ. राजूमामा भोळे यांचे महिलांनी केले औक्षण

    editor deskBy editor deskNovember 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी रविवारी गेंदालाल मिल भागातील तक्षशिला बुद्ध विहार येथे भेट दिली. भाऊबीज सणानिमित्त भगिनींनी राजूमामांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली.

    गेंदालाल मिल भागातील ३५८ ग्रुपचे संस्थापक आयोजक अजय गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक राजू मराठे, संजय शिंदे, विनय चौधरी यांच्यासह अनेक महिला, पुरुष उपस्थित होते. रविवारी भाऊबीज सण असल्यामुळे महिला भगिनींनी राजूमामांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

    यावेळी तक्षशिला बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून राजूमामा भोळे यांनी अभिवादन केले. प्रसंगी स्थानिक प्रश्नांवर नागरिकांनी आ. राजूमामा भोळे यांच्याशी संवाद साधला. आपल्या भागातील प्रलंबित प्रश्नांवर आगामी काळामध्ये मार्ग काढून त्याचे निराकरण करण्यात येईल असे यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.