Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निवडणुकीच्या तोंडावर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली
    क्राईम

    निवडणुकीच्या तोंडावर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

    editor deskBy editor deskNovember 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यात विधानसभा निवडणुकीची आज माघारीची अंतिम दिनांक असतांना एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना राज्याच्या पोलिस महासंचालक या पदावरून हटवल्याचे वृत्त समोर आले आहे.

    काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारींवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिल्याचे केंद्रीय आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच पोलीस महासंचालक शुक्ला यांची तत्काळ बदली करण्यात आली येत असून, पोलीस महासंचालकांचा पुढील पदभार सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवला आहे. यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना उद्या (दि.५) दुपारी १ वाजेपर्यंत पर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

    राज्यातील विधानसभा निवडणूकांसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौरा केला होता. यावेळी आढावा बैठका घेण्यात आल्या. दरम्यान काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी केली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेच्यावेळी अधिकाऱ्यांना केवळ निष्पक्षपणे त्यांचे कर्तव्य पार पाडताना पक्षपातीपणा करू नये अशा इशारा देखील आयुक्तांनी दिला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.