Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : बस दरीत कोसळून ३६ जणांचा मृत्यू
    क्राईम

    मोठी बातमी : बस दरीत कोसळून ३६ जणांचा मृत्यू

    editor deskBy editor deskNovember 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उत्तराखंड : वृत्तसंस्था 

    उत्तरखंडमधील अल्मोड येथे बस थेट दरीत कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. बचाव पथक, पोलिसांसह एनडीआरएफचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले.

    मिळालेल्या माहितीनुसार, नैनी डांडा येथून बस रामनगरकडे जात होती. चालकाला अंदाज न आल्यामुळे सकाळी बस दरीत कोसळली. गीत जागीर नदीच्या किनाऱ्याला बस दरीत कोसळल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून ५ जणांच्या मृत्यूची अधिकृत माहिती समोर आलेली आहे. या अपघातामध्ये काहीजण जखमीही झाले आहेत.

    ४२ आसनी बसमध्ये ३५ पेक्षा अधिक प्रवासी होते. बस दरीत कोसळल्याची घटना सकाळी घडली. या अपघातानंतर काही प्रवासी स्वतः बसमधून बाहेर आले. काही लोक बिथरून खाली पडले. या अपघातमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांनी या दुर्घटनेची माहिती दिली. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.