लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील उखळवाडी गावाजवळील अंजनी नदीजवळ धरणगाव पोलीसांनी जुगार अड्ड्यावर धरणगाव पोलीसांनी छापा टाकून चार संशयित आरोपींना अटक केली आहे तर १६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील उखळवाडी गावाजवळील अंजनी नदीजवळ काही जण जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळाली. त्यानुसार पो.नि. शेळके यांनी स्वत: एक पथक तयार करून रविवारी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात पोलीसांनी जुगार खेळाणारे चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर या कारवाईत एकुण रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकुण १६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्वत: केल्याने जुगार खेळणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहे. धरणगाव पोलीस ठाण्याचे जितेंद्र भदाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई
धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पोलीस नाईक प्रमोद पाटील, समाधान भागवत, संदीप पाटील, जितेंद्र भदाणे यांच्यासह अन्य पोलीसांनी कारवाई केली.


