जळगाव : प्रतिनिधी
रावेर विधानसभा मतदारसंघ सामाजिक रचनेत अल्पसंख्यांक मानला जातो या मतदारसंघाची रचना फार वेगळी आहे आर्थिक संपन्न असलेले मतदार या ठिकाणी आहे. परंतु या मतदारसंघात दाराने फार मोठे अडचणी निर्माण करून ठेवले आहे प्रचंड सामाजिक प्राबल्य असलेला दारा हा ज्येष्ठ नेत्याला अडचणीच्या ठरणार आहे कुठल्याही परिस्थितीत पुत्राला विधानसभेत पाठवण्यासाठी दारापुढे पायघड्या टाकण्याचे काम ज्येष्ठ नेत्याकडून सुरू आहे.
ज्येष्ठ नेत्याने एका ज्येष्ठ भाऊला देखील मध्यस्थी करायला सांगितले असून ज्येष्ठ भाऊ निम्मेमाल उपटण्याच्या तयारीत आहे दाराची मध्यस्थी करून असे या मतदारसंघात बोलले जात आहे. या मतदारसंघात परिवर्तनवादी निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामुळे सध्या कोणाची हवा आहे यापेक्षा चार तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर देखील अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. पुत्र प्रेमाने भारावलेले हे व्यक्ती आता काहीही मोजण्यास तयार आहे त्यामुळे कितपत यश येते हे आगामी काळात सांगणार परंतु तूर्तास तरी दारा अडथळा ठरला आहे हे राजकीय विश्लेषकांच्या नुसार दारा हा सर्व समाजाला समावेशक असल्यामुळे तूर्ता सह तरी डोकेदुखी ठरलेली आहे.