Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘त्या’ अपघातातील जखमी महिलेचा अखेर मृत्यू
    क्राईम

    ‘त्या’ अपघातातील जखमी महिलेचा अखेर मृत्यू

    editor deskBy editor deskOctober 31, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    यावल भुसावळ रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर रोजी एका दाम्पत्याच्या दुचाकीचे टायर फुटून अपघात घडला होता. यात पती जागीच ठार झाला होता तर पत्नी गंभीर जखमी झाली होती. गंभीर जखमी असलेल्या हेमलता जगदीश अत्तरदे यांचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मंगळवारी शिरसाड गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    मिळालेल्या माहितीनुसार, यावल भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर पेट्रोल पंपाच्या समोर शुक्रवारी सायंकाळी चार वाजता भुसावळकडून यावलकडे दुचाकी क्रमांक एम. एच.१९, एन. २४३३ द्वारे जगदीश वासुदेव अत्तरदे (वय ५३) व त्यांची पत्नी हेमलता जगदीश अत्तरदे (वय ४५) हे पती-पत्नी येत होते. दरम्यान, पेट्रोल पंपाच्या जवळ त्यांच्या दुचाकीचे पुढील टायर फुटले आणि भरधाव वेगातील दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली.

    या अपघातात जगदीश अत्तरदे जागीच ठार झाले होते. तर त्यांची पत्नी हेमलता या गंभीर जखमी होत्या. गंभीर जखमी महिलेवर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तर उपचारादरम्यान सोमवारी रात्री महिलेचा मृत्यू झाला व मंगळवारी शिरसाड गावात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.