जळगाव : प्रतिनिधी
बनावट कागदपत्रे व क्रमांक असलेली कार पाच लाखात विक्री करुन पियूष कमल किशोर मनियार (२६, रा. गणेशवाडी) या तरुणाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी संदेश चंद्रकांत काजळे (रा. सिडको, नाशिक) याच्याविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संदेश काजळे याचा नाशिक येथे जुने वाहन विक्रीचा व्यवसाय आहे. पियुष मनियार यांना जुनी कार घ्यायची असल्याने त्यांनी संदेशशी संपर्क साधला. त्यानुसार संदेश व पियुष यांच्यात गोविंदा रिक्षा थांब्याजवळ ५ लाख रुपयात कारचा व्यवहार झाला. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधी कार बघणे, पैसे देणे, कागदपत्रे बनविणे अशी प्रक्रिया झाली. यात वाहनाचे कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पियुष यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली